मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत `महायात्रा`, matoshree to shivaji park mahayatra

मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत `महायात्रा`

मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत `महायात्रा`
www.24taas.com, मुंबई

एक नेता नेता, एक पक्ष, ४७ वर्षं... असा विक्रम असलेल्या शिवसेनेच्या शिवतीर्थावर, अर्थात शिवाजी पार्कवर आज सकाळी १० वाजल्यापासून बाळासाहेबांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. तिथंच त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला जाईल. सकाळी आठ वाजता मातोश्रीहून शिवाजी पार्ककडे ‘महायात्रा’ निघणार आहे.

शिवाजी पार्कात अंत्यदर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ असलेलं प्रवेशद्वार आणि समर्थ व्यायाम मंदिराजवळच्या प्रवेशद्वारावर सर्वसामान्यांच्या रांगा असतील. यात समर्थ व्यायामशाळेजवळ महिलांसाठी स्वतंत्र रांग असेल. उद्यान गणेशच्या प्रवेशद्वारातून ठाकरे कुटुंबीय, शिवसेना आणि अन्य पक्षीय नेते तसंच व्हीआयपींना प्रवेश असेल. राजा बढे चौकाकडे असलेल्या गेटमधून बाहेर पडण्याचा मार्ग ठेवण्यात आलाय. व्हीआयपींचं पार्किंग सावरकर मार्गावर तर मोठ्या गाड्या आणि बस घेऊन येणाऱ्या शिवसैनिकांना सेनापती बापट मार्गावर गाड्या पार्क करता येतील.

First Published: Sunday, November 18, 2012, 07:18


comments powered by Disqus