Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:04
www.24taas.com, पालीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गेली काही दिवस जास्तच खालावल्याने राज्यभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांच्या प्रकृती विषयी चिंतेत आहेत. राज्यभर बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेक धार्मिक उपक्रम राबवीत आहेत.
बाळासाहेब आणि उद्धव यांच्या प्रकृती विषयी राज ठाकरे यांना काळजी वाटत असल्याने ते बाळासाहेबांची भेट देखील घेत असताना बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणि बाळासाहेंबाना दीर्घाआयुष लाभण्यासाठी मनसैनिकांनी बाप्पांच्या चरणी धाव घेतली आहे.
रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पाली येथील अष्टविनायक बल्लाळेशवर गणपती आणि ठाकरे कुटुंबियांची कुलदैवत असणाऱ्या पाली जवळील कोंडजाई देवीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक घालून आरती करून साकडे घातलं.
First Published: Wednesday, November 14, 2012, 17:52