Last Updated: Tuesday, November 20, 2012, 13:10
www.24taas.com, मुंबईगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केलं. सध्या नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारात व्यस्त आहे.
त्यामुळे अंत्यविधीवेळी त्यांना उपस्थित राहता आलं नाही. मोदी आणि बाळासाहेब यांच्यात चांगली मैत्री होती. मोदींच्या कार्याचा गौरव बाळासाहेबांनी वेळोवेळी करून त्यांच्या कामाची पोचही दिलेली होती.
बाळासाहेब हे नेहमीच परखड मत व्यक्त करणारे असे होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावरही बाळासाहेबांनी टीका केली होती. मात्र राजकीय टीका, आणि मैत्री यात कधीही गल्लत झाली नाही.
First Published: Tuesday, November 20, 2012, 12:56