Last Updated: Thursday, November 15, 2012, 10:45
www.24taas.com, मुंबईभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी थोड्यावेळा पूर्वीच बाळासाहेबाची भेट घेतली आहे. आणि तमाम महाराष्ट्रवासियांसाठी त्यांनी चांगली बातमी दिली आहे. बाळासाहेब यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांची इच्छाशक्तीही प्रबळ असल्याने ते यातून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
कालपेक्षा आज बाळासाहेबांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मुंडे यांनी दिलीये. मुंडे आज सकाळी मातोश्रीवर दाखल झाले.
बाळासाहेबांची प्रकृतीच्या वृत्तामुळं राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये. गोपीनाथ मुंडे यांनीही मातोश्रीवर बाळासाहेबांच्या चौकशीसाठी धाव घेतलीये.
First Published: Thursday, November 15, 2012, 10:31