Last Updated: Saturday, November 24, 2012, 13:25
www.24taas.com, मुंबईउद्योगमंत्री नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झालेत. सांत्वन करण्यासाठी ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेत.
बाळासाहेबांच्या निधनानंतर नारायण राणे प्रथमच राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. नारायण राणे यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. बाळासाहेबांच्या निधनानंतर राणे प्रथमच राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्यावेळी नारायण राणे भारतात नव्हते. बाळासाहेबांची भेट व्हावी, अशी इच्छा राणे यांनी बोलून दाखविली होती. परंतु, बाळासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. भारतात परतल्यानंतर राणे यांनी आज राज यांची भेट घेऊन सांत्वन केले.
First Published: Saturday, November 24, 2012, 13:12