Last Updated: Saturday, November 24, 2012, 18:58
www.24taas.com, मुंबईमुंबईचे काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कारणे दाखवा नोटीस बजावलीय. काल मुंबई महापालिका सभागृहात काँग्रेसच्या सुनील मोरेंनी इंदु मिलच्या जागेवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं, अशी मागणी केली होती.
पक्षाची अधिकृत भूमिका नसतानाही त्यांनी ही मागणी केल्यानं त्यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. तर सुनील मोरे यांना केवळ कारणे दाखवा नोटीस नका देऊ.
तर त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी आरपीआय नेते रामदास आठवलेंनी केली आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत राजकारण चांगलच तापू लागलं आहे.
First Published: Saturday, November 24, 2012, 11:55