Last Updated: Tuesday, November 20, 2012, 13:05
www.24taas.com, मुंबईपालघरमधल्या धाडा हॉस्पिटलच्या तोडफोडप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आलीये. बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या बंदबाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट पोस्ट केली होती. तर दुस-या एका तरुणीनं त्या पोस्टला लाईक केलं होतं. या प्रकरणी ही तोडफोड कऱण्यात आली होती.
पालघरमधल्या काही लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तरुणींना विचारणा केली. त्याला संबधित तरुणींनी उद्धट उत्तर दिल्यानंतर नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. शिवाय तरुणींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबधित तरुणींना अटक केली.
शिवाय तोडफोड करणा-या ११ नागरिकांनाही अटक केली आहे. बंदबाबत वक्तव्य करणा-या तरुणींना झालेली अटक आणि त्यांच्याशी संबधित हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
First Published: Tuesday, November 20, 2012, 11:11