शिवसैनिकांनो `बाळासाहेबां`साठी शांतता राखा- शिवसेना, Please Maintain Discipline tomorrow in Shivaji park- shivsena

शिवसैनिकांनो `बाळासाहेबां`साठी शांतता राखा- शिवसेना

शिवसैनिकांनो `बाळासाहेबां`साठी शांतता राखा- शिवसेना
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुखाचं पार्थिव सध्या मातोश्रीवर आहे. उद्या सकाळी साधारण ७.३० वा. मातोश्रीवर निघेल. आणि त्यानंतर ते शिवतीर्थावर ठेवण्यात येईल त्यानंतर १० वाजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात येईल. राज्यातूनच नव्हे तर देशभरातून शिवसैनिक येणार असल्याने प्रचंड गर्दी होणार असल्याने.. शिवसैनिकांनी सार्वजनिक संपत्तीला हानी पोहचणार नाही यांची दक्षता घ्यायला हवी. शिवसैनिक हा शिस्तीने साऱ्या गोष्टी पार पाडेल असं शिवसेना नेता संजय राऊत यांनी सांगितलं. साऱ्यांना बाळासाहेबाचं अंतिम दर्शन घेता येणार आहेत.

महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे सगळीकडे बंद केला जातोय... मात्र बस, रेल्वे, विमानसेवा या बंद करू नयेत... जेणेकरून मुंबईकडे येणाऱ्या शिवसैनिकांना त्याने त्रास होईल, तसेच जवळपास म्हणजे ठाणे, कल्याण आणि इतर भागातून येणाऱ्या लोकांनी शक्यतो आपल्या खाजगी गाड्या आणू नये. जेणेकरून वाहतूकीचा खोळंबा होईल, आपण सहकार्य कराल याची खात्री आहे.

प्रशासनावर प्रचंड ताण आहे. त्यामुळे आपण सहकार्य करावं. अशी विनंती केली राऊत यांनी केली आहे. शिवसैनिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा, कुणी उत्स्फुर्तपणे बंद पाळतील मात्र कोणालाही हानी पोहचणार नाही याची काळजी घ्या.

First Published: Saturday, November 17, 2012, 21:24


comments powered by Disqus