Last Updated: Thursday, November 15, 2012, 14:38
www.24taas.com, मुंबईबाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. प्रार्थना एकच, देवा बाळासाहेबांना आजारातून बाहेर काढ. साहेब, बरे व्हा.
बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडावा ते ठणठणीत बरे व्हावेत यासाठी धुळ्यातल्या शिवसैनिकांनी एकवीरा देवीच्या मंदिरात महाआरती केली. बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी महाआरती केलीये. तर भोपाळमध्ये बाळासाहेबांसाठी यज्ञ केला जातोय.
बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी सगळेच शिवसैनिक चिंतातूर झालेत. आणि देवाचा धावा करताएत. ठाण्याच्या कौपीनेश्वर मैदानात बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी होमाचं आयोजन केलं होतं.
सोलापुरात बाळासाहेबांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी शिवसेनेच्यावतीनं ग्रामदैवत रुपाभवानी मंदिरात आरती करण्यात आली. बाळासाहेब बरे व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी अंबेचा जागर केला.
अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या गणपतीची शिवसैनिकांनी महाआरती केली. संपूर्ण नगर शहरातील शिवसैनिक आरतीसाठी उपस्थित होते. तर अमरावती जिल्ह्यातील शिवसैनिकांनीही अंबादेवी आणि एकवीरादेवीच्या मंदिरात बाळासाहेवांच्या दियुष्यासाठी साकडं घातलं.
First Published: Thursday, November 15, 2012, 14:38