`मातोश्री`वर राज-अमिताभ समोरा-समोर Raj & Amitabh come across on `Matoshree`

`मातोश्री`वर राज-अमिताभ समोरा समोर

`मातोश्री`वर राज-अमिताभ समोरा समोर
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेबांना सध्या लाइफ सपोर्टिंग सिस्टमवर ठेवण्यात आल्याचं अमिताभ यांना डॉक्टरांकडून समजलं.

अमिताभ बच्चन यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या खोलीपर्यंत नेले. यावेळी सुमारे ४ वर्षांनी राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन समोरासमोर आले. तसंच राज ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल अमिताभ यांना माहिती दिली.

राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संबंध मधल्या काळात तणावपूर्ण बनले होते. अमिताभ बच्चन यांच्या परप्रांतीय असण्यावर राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली होती, तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनी राज ठाकरे यांना खिजवत ‘आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरेंना ओळखतो, राज ठाकरे आम्हाला माहीत नाही. आम्ही मराठी बोलणार नाही’ असं वक्तव्य केलं होतं. यानंतर पेटलेल्या वादावर पडदा घालत अमिताभ बच्चन यांनी राज ठाकरेंची माफी मागितली होती. मात्र बाळासाहेबांचं प्रकृती अस्वास्थ्याने राज आणि अमिताभ यांना एकत्र आणण्याचं काम केलं.

First Published: Thursday, November 15, 2012, 09:36


comments powered by Disqus