Last Updated: Tuesday, November 20, 2012, 14:22
www.24taas.com, मुंबईराज आणि उद्धव या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु झालेत. ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी हा पुढाकार घेतलाय. बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा निर्धार चंदूमामा यांनी केलाय. दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी बाळासाहेबांची इच्छा होती.
ही इच्छा आपण पूर्ण करणार असल्याचं चंदूमामा यांनी म्हटलयं. एकत्रिकरणाच्या मुद्यावर दोन्ही भावांशी अनेकवेळा चर्चा झालीये. दोघांचा जवळचा नातेवाईक म्हणून प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य असल्याचं चंदूमामा वैद्य यांनी म्हटलयं. राज उद्धव यांना यापूर्वी एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले होते.
मात्र त्यात शिवसैनिकांना यश आलं नव्हतं. मात्र आता ठाकरे बंधूंच्या मामांनीच एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतल्यानं दोन भावांचं मनोमिलन होईल का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.
First Published: Tuesday, November 20, 2012, 14:07