राज ठाकरे, अमिताभ, भुजबळ मातोश्रीवर, raj thacekray, amithabh bacchan, bhujbal reach matorshtri

राज ठाकरे, अमिताभ, भुजबळ मातोश्रीवर

राज ठाकरे, अमिताभ, भुजबळ मातोश्रीवर
www.24taas.com,मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत. तसेच राज ठाकरे, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मातोश्रीवर दाखल झाले आहे.

बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. राज ठाकरे हे दोघंही मातोश्रीवर उपस्थित आहेत. बुधवारी रात्री उशीरा राहुल शेवाळे, रविंद्र वायकर, सुभाष देसाई हेही मातोश्रीवर दाखल झाले होते. शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर दाखल झाले आहे. त्यानंतर संजय दत्त आणि मान्यता दत्तही मातोश्रीवर दाखल झाले आहेत.


राज उद्धवचे शिवसैनिकांना शांततेचे आवाहन
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर आहे. ते सध्या लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत. परिस्थितीचं गांभीर्य राखून शिवसैनिकांनी शांतता राखावी’ असं आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मातोश्रीच्या गेटवर येऊन केलंय. तर डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय. सध्या, मातोश्रीवर झालेली गर्दी खूप काही सांगून जातेय. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचं घट्टं नातं इथं स्पष्टपणे दिसून येतंय.

गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. जलाल पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा चमू बाळासाहेबांवर उपचार करत आहेत. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.

First Published: Thursday, November 15, 2012, 01:11


comments powered by Disqus