Last Updated: Saturday, November 17, 2012, 11:11
www.24taas.com, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब लवकरच तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यकत केला. बाळासाहेबांसाठी सुरु असलेल्या प्रार्थनांची प्रचिती येत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, बाळासाहेब आजारपणातून पुन्हा बरे होतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील, असं शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन रात्री बारा वाजता मातोश्रीमधून बाहेर आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी बाळासाहेब पुन्हा बरे होण्याचा विश्वास व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे दैवत आहेत आणि त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांना निश्चितच यश येईल, असं वाटत असल्याचं कदम यांनी यावेळी सांगितलं.
First Published: Saturday, November 17, 2012, 10:49