बाळासाहेबांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे- संजय राऊत, Sanjay Raut on Balasaheb health

बाळासाहेबांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे- संजय राऊत

बाळासाहेबांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे- संजय राऊत
www.24taas.com, मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांची इच्छाशक्तीही प्रबळ असल्याने ते यातून लवकरच बाहेर पडतील असा विश्वास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना प्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत अशी संजय राऊत यांनीच ही माहिती दिली आहे. बाळासाहेब डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसाद देतायत. संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी `झी २४ तास`ला ही माहिती दिली.

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टर पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत. तसेच डॉक्टरांच्या उपचारांना बाळासाहेबही चांगला प्रतिसाद देत आहेत. काल रात्रीनंतर बाळासाहेबांचा प्रकृती चांगली असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.


First Published: Thursday, November 15, 2012, 11:21


comments powered by Disqus