शाहरुखने मागितली बाळासाहेबांसाठी दुवा, SHAHARUKH PRAY FOR BAL THACKERAY

शाहरुखने मागितली बाळासाहेबांसाठी दुवा

शाहरुखने मागितली बाळासाहेबांसाठी दुवा

www.24taas.com, मुंबई
अभिनेता शाहरुख खानही रात्री उशिरा ‘मातोश्री’वर दाखल झाला. बाळासाहेबांच्या उदंड आयुष्यासाठी मी परमेश्वाराकडे प्रार्थना करतो. दुवा मागतोय. हे युद्ध ते नक्कीच जिंकतील आणि त्यांच्या प्रकृतीला आराम मिळेल असा मला विश्वा स आहे, अशा भावना त्याने ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.

प्रार्थना
दहिसरच्या विठ्ठल मंदिरात महाआरती करण्यात आली. कल्याणमध्येही मुस्लिमांनी शिवसेनाप्रमुखांना दीर्घायुरारोग्य लाभावे यासाठी दुवा मागितली. प्रसिद्ध गझलकार अफसर दकनी यांनी कुराणाचे पठण केले. डोंबिवलीतही शिवसैनिकांनी महामृत्युंजय जपाचे पठण केले. अंबरनाथमधील हेरंब मंदिरात तसेच श्रीगजानन महाराजांच्या मंदिरात प्रार्थना करण्यात आली. अंबरनाथमधील शिवसैनिकांनी शिवमंदिरात जाऊन शंकराला अभिषेक केला, तर सिंधी बांधवांनी झुलेलाल मंदिरात प्रार्थना केली.

बाळासाहेबांच्या प्रकृतीमुळे मी खूप अस्वस्थ - लता मंगेशकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची मला खूप काळजी वाटते आहे, त्यांची मला खूप काळजी वाटत असल्याचे गानकोकीळा लता मंगेशकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

दरम्यान लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांनी त्यांचा १८ नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रद्द केला आहे. १८ नोव्हेंबरला त्यांच्या एका म्युझिक कंपनीचे उद्घाटन होणार होते. ते आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. लता मंगेशकर या कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचे आणि शिवसेनेचे जुने नाते आहे. त्या बाळासाहेबांना खूप मानतात, त्यामुळे बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खूप अस्वस्थ झाले आणि त्यांना काळजी वाटू लागली आहे.

बाळासाहेबांचे संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच - अमिताभ
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. अमिताभ बच्चन यांनी काल मातोश्रीवर उपस्थिती लावली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय, बाळासाहेब संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच जगले.

बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता लागली आहे. सध्या त्यांच्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. मला ज्यावेळी कुली सिनेमा दरम्यान अपघात झाला, त्यावेळी मला नेणारी अँब्युलन्स शिवसेनेचीच होती. बोफोर्स प्रकरणी नाव आल्यावर त्यांनीच मला धीर दिला. बाळासाहेब संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच जगले, असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे.

बंगळुरू येथे ‘कुली’ सिनेमा दरम्यानच्या अपघातानंतर ब्रिच कॅंडी हॉस्पीटलमध्ये मला ते भेटायला आले होते. माझ्या तब्बेतीची काळजी घेतली. त्यांनी माझ्यासाठी कार्टुन आणले होते. त्यात म्हटले होते. हार गए यमराज. तू घाबरू नकोस आणि काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. तू एक कलाकार आहेस. तू चांगले काम करीत आहेस.

बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपाच्यावेळी मला त्यांनी मातोश्रीवर बोलविले, तू सर्व खरं सांग. त्यावेळी त्यांनी मला धीर दिला. आजची रात्र माझ्यासाठी सर्वात मोठी होती.

First Published: Friday, November 16, 2012, 08:14


comments powered by Disqus