Last Updated: Friday, October 19, 2012, 19:29
www.24taas.com, मुंबईभाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींची पाठराखण केली. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय.
गडकरी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आहे. ही जमीन सरकारने त्यांना भाडेपट्ट्यावर दिली असल्याचे बाळासाहेबांनी म्हटले आहे. केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचे हाल अण्णा हजारेंसारखे होतील, अशी खरमरीत टीका केली आहे.
दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकारी अंजली दमानिया यांनी गडकरींवर विदर्भातील शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप लावला होता.
गडकरींनी जमीन घेतली आणि त्या ठिकाणी कारखाना उभा केला त्याबद्दल केजरीवाल आणि अंजली दमानिया यांच्या पोटात का दुखलं. त्यांनी चोरी केली नाही किंवा कुठे दरोडा टाकला नाही, असेही बाळासाहेबांनी यावेळी म्हटले आहे.
बाळासाहेबांनी यावेळी अजित पवारांवरही टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, अजित पवार जलसंपदा मंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.
First Published: Friday, October 19, 2012, 17:35