Last Updated: Wednesday, November 28, 2012, 18:01
www.24taas.com, मुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आग्रही नाही. मात्र ही जागा शिवसेनेसाठी पवित्र जागा आहे.
त्यामुळे शिवाजी पार्कवरील या जागेवर शिवसेनेचाच हक्क राहील, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या स्मारकाबाबतचा वाद जास्तच चिघळू लागला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधाचं राजकारण केलं, तर मैदानं आणि उद्यानांच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने केलेले घोटाळे जनतेसमोर आणू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
First Published: Wednesday, November 28, 2012, 17:50