Last Updated: Thursday, November 15, 2012, 16:36
www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. त्यामुळे शिवसेनेचा जन्म झालेल्या दादर परिसरसह, लालबाग, परळ, गिरगाव या भागामध्ये अघोषित पुकारण्यात आला आहे.
बाळासाहेबांच्या प्रकृती खालावल्यामुळे मुंबईसह राज्यात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या दादरमध्ये आज सकाळपासून संचारबंदीसारखे वातावरण आहे. कायम गजबजलेला असणा-या दादरमधील रस्त्यांवर शुकशुकाट आहे.
येथील व्यावसायिकांनी उस्फूर्तपणे बंद पाळला आहे. राज्यातील अनेकभागात बाळासाहेबांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी होम-हवन करण्यात येत आहेत. बुधवारी रात्री पासून `मातोश्री`वर असलेले राज ठाकरे आज सकाळी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर आज दुपारी पुन्हा ते `मातोश्री`वर आले होते. आणि पुन्हा ते त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत.
First Published: Thursday, November 15, 2012, 16:21