Last Updated: Saturday, May 19, 2012, 16:23
www.24taas.com, मुंबई 
बॉलिवूड स्टार शाहरूख खानवर पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सामनाच्या संपादकिय लेखात बाळासाहेबांनी लिहलं आहे की, शाहरूखवर पाच वर्षाची बंदी नव्हे, तर आजीवन बंदी लावली पाहिजे. अशी टीकाच बाळासाहेबांनी केली आहे.
संपादकिय लेखात बाळासाहेबांनी शाहरूखवर चांगलेच आसूड ओढले आहेत. शाहरूख हा दारू पिऊन धिंगाणा घालत होता असा आरोपही केला आहे. नेहमीप्रमाणे शाहरूखने सारं काही खोटं आहे असं म्हटलं आहे, त्यामुळे तो सेलिब्रेटी नसून 'सिली'ब्रेटी आहे. अमिताभ, ऋतिक, आमिर हे देखील सेलिब्रेटी आहेत आणि त्यांची मुलही सार्वजनिक ठिकाणी जातात. पण यांच्या पैकी कोणी दारू पिऊन धिंगाणा केल्याचे ऐकण्यात आले नाही..
अमेरिकेच्या विमानतळावरील सुरक्षा रक्षक शाहरुख खान यांना चार-पाच तास अडकवून ठेवतात. त्यांचे कपडे उतरवून झडती घेतात तरी खान यांचा रागाचा पारा चढत नाही. पण वानखेडेवरील सुरक्षा रक्षकांशी मात्र ते हुज्जत असंही बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरूखला सुनावले आहे.
First Published: Saturday, May 19, 2012, 16:23