Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:21
www.24taa.com, मुंबई मराठवाडा हा नव्याने पाकिस्तानची कास धरत आहे. मराठवाड्याचे क्षेत्र हे पाकिस्तान होत आहे, अशी ठाकरी टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीय लेखात केली आहे. 26/11 मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी लष्कर ए तैय्यबा हस्तक अबू जिंदाल तथा अबू हामजा हा मराठवाड्यातील आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
मराठवाडा ही संताची भूमी ओळखली जात आहे. मात्र, या भूमीत दहशतवादाचा अड्डा तयार झाला आहे. त्यामुळे ही भूमी अतिरेक्यांची म्हणून ओळली जाऊ लागली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मराठवाड्यातून दहशतवादी कारवाया सुरू आहेत. मराठवाडा आतंकवादाचे भरती केंद्र ठरत आहे. असे असताना राज्य सरकार आणि गृहमंत्रालयाचे झालेले दुर्लक्ष याला खतपाणी घालत आहे. सरकारच्या कार्यशैलीवर त्यामुळे बोट जाते, असे संपादकीयमध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील घाटकोपर स्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट, गुजरात स्फोटाशी मराठवाड़्यातील दहशतवादी लोकांचा संबंध आहे, असे संबोधण्यास जागा निर्माण झाली आहे. मराठवाड्यात दहशवादाचे केंद्र उभे असल्याने देशाबरोबरच महाराष्ट्राला जास्त धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, ठाकरे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा काय करीत आहे? महाराष्ट्रात अतिरेकी प्रशिक्षण घेत असल्याने याची पोलिसांना माहिती कशी असत नाही?
First Published: Thursday, June 28, 2012, 09:21