Last Updated: Sunday, November 18, 2012, 07:38
www.24taas.com, मुंबई शिवसेनाप्रमुखांच्या जाण्याचं दुःख अवघ्या महाराष्ट्राला आहे. हे दुःख व्यक्त करताना आणि अंत्यदर्शनासाठी येताना शिवसैनिकांनी जबाबदारीनं वागावं, असं आवाहन शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. याशिवाय दादर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आलीय.
बाळासाहेबांची महायात्रा आणि अंत्यदर्शनासाठी दादर परिसरात वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत. आज रात्री दहा वाजेपर्यंत काही मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलीय तर अनेक मार्गांवर पार्किंगला बंदी केली गेलीय. यात वीर सावरकर मार्ग आणि डॉक्टर अॅनी बेझंट रोडवरची वाहतूक मोरी रोड ते वरळीकर चौकापर्यंत सर्वसामान्य वाहनांसाठी बंद असेल. एलजे रोड आणि गोखले रोडवरील वाहतूक पूर्ण बंद राहील तर खोदादाद सर्कलपासून टिळक पूलावरची वाहतूकही संपूर्ण बंद असेल. याखेरीज सावरकर रोड, रानडे रोड, केळकर मार्ग, कुळसेकर मार्ग, एलजे रोड, गोखले रोड, कटारिया रोड आणि सयानी रोडवरील वाहतुकही वळवण्यात आलीय.
First Published: Sunday, November 18, 2012, 07:23