संसदेत बाळासाहेबांना श्रद्धांजली, Tributes to Parliament Balasaheb Thackeray

संसदेत बाळासाहेबांना श्रद्धांजली

संसदेत बाळासाहेबांना श्रद्धांजली
www.24taas.com,नवी दिल्ली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहाने श्रद्धांजली वाहिण्यात आली. आजपासून हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.

लोकसभा अध्यक्ष मीराकुमार आणि राज्यसभेचे अध्यक्ष व उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्व खासदारांनी उभे राहून आदरांजली वाहिली. त्यानंतर मीराकुमार आणि अन्सारी यांनी बाळासाहेब यांनी केलेल्या कार्याची माहिती सभागृहाला दिली.

दरम्यान, सरकारला विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मुद्यांवरुन घेरत लोकसभेसह राज्यसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात करताच दोन वेळा संसद तहकूब करण्यात आली. दुपारी दिवसभरासाठी लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.

संसदेचे कामकाज सुरू असताना बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संसदेच्या अधिवेशनातील पहिला दिवस तहकूब करावा, अशी मागणी भाजपने सरकारकडे केली. मात्र, सरकारने भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. तसेच भाजपच्या या मागणीला डाव्या पक्षांनी कडाडून विरोध केला होता.

First Published: Thursday, November 22, 2012, 13:42


comments powered by Disqus