Last Updated: Wednesday, January 23, 2013, 14:24
www.24taas.com, मुंबई शिवसेना 'पक्षप्रमुख'पदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आलीय. पक्षप्रमुख हेच पद आता पक्षातील सर्वोच्च पद असेल. शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं, पक्षातर्फे सांगण्यात येतंय. तसंच यावेळी युवा सेने ही शिनेसेनेची अंगिकृत संघटना म्हणून जाहीर करण्यात आलंय.
मुंबईत पक्षाच्या राष्ट्रीय कार्य़कारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत उद्धव यांच्या पक्षप्रमुखपदी नियुक्तीचा ठराव मांडण्यात आला आणि तो एकमताने संमत करण्यात आला. याशिवाय शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्षपदही रद्द केलं गेलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना असणारे सर्व अधिकार यापुढे उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकृतपणे पक्षाची सूत्रं सोपवली गेलीत.
युवा नेते आदित्य ठाकरे यांनाही आज शिवसेनेचे नेतेपद देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्याबाबत शिवसेनेनं अजूनपर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, युवा सेना शिवसेनेची अंगिकृत संघटना असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
First Published: Wednesday, January 23, 2013, 14:14