Last Updated: Tuesday, November 20, 2012, 18:55
www.24taas.com, मुंबईबाळासाहेबांच्या अस्थीकलशासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजीपार्कवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते.. आजही उद्धव ठाकरेंना अश्रू अनावर झाले आणि बाळासाहेबांच्या आठवणीत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिवसेनाप्रमुखांवर काल शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित लाखो जनसमुदायाला अश्रू अनावर झाले होते.
काल बाळासाहेबांची अंत्ययात्रा मातोश्रीकडून शिवाजीपार्ककडे निघाली त्यावेळीही उद्धव ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनाही रडू कोसळले होते.
बाळासाहेबांच्या अस्थीचे मिळणार शिवसैनिकांना दर्शनशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थीकलशाचं राज्यातल्या सर्व शिवसैनिकांना दर्शन घेता येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसेनाप्रमुखांचा अस्थीकलश नेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या जिल्हासंपर्कप्रमुखांकडे हे अस्थीकलश सोपवण्यात येणार आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत अस्थीकलशाचं दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर अस्थीकलशांचं नद्यांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेच्या हाती सेनेची धुरा- जोशी सरबाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे संपूर्ण काम आता उद्धव ठाकरे हातात घेतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशींनी व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे पक्षकामात स्वतःला झोकून पक्ष वाढवतील, पक्ष पुढे नेतील असंही मनोहर जोशींनी सांगितलं.
First Published: Monday, November 19, 2012, 18:28