बाळासाहेबाचं स्मारक कुठे आणि कसे व्हावे, मांडा आपलं रोखठोक मत, Where & how establish in Balasaheb Statue

बाळासाहेबाचं स्मारक कुठे आणि कसे व्हावे, मांडा आपलं रोखठोक मत

बाळासाहेबाचं स्मारक कुठे आणि कसे व्हावे, मांडा आपलं रोखठोक मत
www.24taas.com,मुंबई

शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांकडून इच्छा आहे.

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाले. शिवाजी पार्क, शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिक यांचं अतूट नातं होतं. त्याच शिवाजी पार्कवर आपल्या लाखो शिवसैनिकांच्या साक्षीनं बाळासाहेबांनी अखेरचा निरोप घेतला. बाळासाहेबांच्या जाण्यानं शिवसैनिक पोरके झालेत, शिवाजी पार्क सुन्न झाले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं ही शिवसैनिकांकडून इच्छा आहे, अशी माहिती मनोहर जोशी यांनी दिली.

दरम्यान, स्मारकाबाबत राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्मारकाबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखविला आहे.

तुम्हांला काय वाटते... मांडा तुमचं रोखठोक मत.... बाळासाहेबाचं स्मारक कुठे आणि कसे व्हावे याबाबत मांडा आपलं मत... खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या प्रतिक्रिया.... तुमच्या प्रतिक्रिया दाखविण्यात येतील आमच्या विशेष कार्यक्रमात.

First Published: Tuesday, November 20, 2012, 16:20


comments powered by Disqus