24taas.com- what if u see cobra in dream

स्वप्नात नाग दिसल्यास

स्वप्नात नाग दिसल्यास

www.24taas.com, मुंबई

आपल्याकडे गावांमध्ये, रस्त्यांत कधीही साप दिसतो. रस्त्यात साप पाहून आपल्याला भीती वाटते. पण, रस्त्यात दिसणं हा एक संकेत असतो. सापाबद्दल आपल्याकडे बरेच समज-गैरसमज आहेत. रस्त्यात साप दिसणं हा अपशकून मानला जातो.

साप हा खरं तर शास्त्रांमध्ये देव मानला गेला आहे. शिवशंकराच्या गळ्यात साप असतो. विष्णू भगवानही नागावरच पहुडलेले असतात. नाग मारल्यास नागबळीचा विधी करावा लागतो. नाग मेल्यास त्याचं दहन केलं जातं.

असा साप हा आपल्याला इशारे देत असतो. भविष्यातील संकटांची चाहूल देत असतो. रस्त्याने जाताना अचानक रस्त्यात साप दिसल्यास आपल्या कामात अडचणी वाढणार असा इशारा असतो. अशा वेळी साप गेल्यावर काहीवेळ थांबून शंकराचं स्मरण करावं. मगच पुढे जावं. साप हा नेहमी संकटसूचक असतो. मात्र स्वप्नात नाग दिसल्यास धनप्राप्ती होण्याचा शुभशकून असतो. मात्र इतरवेळी हा अपशकून मानला जातो.

First Published: Wednesday, August 15, 2012, 14:22


comments powered by Disqus