लग्न जमत नाही... तर करा गणेशाची उपासना, Astro News for marriage

लग्न जमत नाही... तर करा गणेशाची उपासना

लग्न जमत नाही... तर करा गणेशाची उपासना
www.24taas.com

लग्नाविषयी अनेक समस्या नेहमीच दिसून त्यामुळे लग्न पाहावं करून अशी म्हण रूढ झाली.. काही लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत. खूप प्रयत्न करूनही यश येत नाही.

अशा वेळी निराशा येण्याचीही शक्यता असते. परंतु भगवान श्रीगणेशाची कृपा झाली तर ही समस्या दूर होऊ शकते. तुमचा विवाह जुळत नसेल तर गणेशोत्सव काळात एखाद्या कुंभाराच्या अंगणातून माती आणून गणपती तयार करा. अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज या मूर्तीचे पूजन करा.

लाडूचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा 5 माळा जप करा. या मंत्राचा जप अनंत चतुर्दशीनंतरही चालू राहू द्या. लवकरच तुमचे लग्न ठरेल तेव्हा गणेशाची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा.

First Published: Thursday, January 10, 2013, 08:29


comments powered by Disqus