Last Updated: Wednesday, January 16, 2013, 07:52
www.24taas.comपिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व फारच जास्त आहे. पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्र येत नाही आणि सुख-शांती तेथे वास करते. विज्ञानाने देखील पिंपळवृक्षाचे महत्त्व विशद केले आहे.
पिंपळवृक्षाखाली शिव शंकराची प्रतिमा स्थापन करुन त्यावर दररोज जलाभिषेक करावा. नियमीत पूजा करावी त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव येईल. दारिद्र्य कमी होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. हनुमानाची तुमच्यावर कृपा व्हावी असे वाटत असेल तर पिंपळवृक्षाची पुजा करावी. पिंपळवृक्षा खाली बसून हनुमानाची पूजा करावी त्यामुळे रामभक्त हनुमान प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसेच साधकाची मनोकामना पूर्ण होते.
शनि महाराजांच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीही पिंपळवृक्षाची पूजा करणे उपयोगाचे ठरते. जर नियमीत पिपंळवृक्षाला जलाभिषेक केल्यास शनि दोषापासून दूर रहाता येते, शनिदेवाची शांती होते. शनिवार संध्याकाळी पिंपळवृक्षाखाली दिवा लावावा.
First Published: Wednesday, January 16, 2013, 07:42