करा उपासना विद्या देवतेची, यश मिळेल हमखास, Astro News successes in study

करा उपासना विद्या देवतेची, यश मिळेल हमखास

करा उपासना विद्या देवतेची, यश मिळेल हमखास
www.24taas.com

अभ्यास करताना... नेहमीच एकाग्रचित्त राहण्यासाठी खालील गोष्टी आचरणात आणल्यास त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल. श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते.

अभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येशी संबंधित देवता श्री गणपति आणि श्री सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करावी.
अभ्यास करतांना मध्ये मध्ये कुलदेवतेला उपास्यदेवतेला प्रार्थना करावी. अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी दहा मिनिटे नामजप करावा. प्रार्थनेनंतर अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी १० मिनिटे कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करावा.

असे केल्याने तुम्हांला नक्कीच एकाग्रता साधता येईल, जेणेकरून तुमेच चित्त स्थिर राहून त्याचा फायदा विद्या संपादन करण्यात होईल.

First Published: Tuesday, February 19, 2013, 07:53


comments powered by Disqus