Last Updated: Sunday, October 7, 2012, 16:16
www.24taas.com1) धर्मात श्राध्द घालण्यासाठीचे काही विधाने तयार केली गेली आहेत. श्राध्द घातल्याने पितृदोष नष्ट होऊन आत्म्याला शांती प्राप्त होते, असा समज आहे. शास्त्रानुसार श्राध्दकार्य करण्यासाठी चांगल्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता भासते. शास्त्रानुसार श्राध्दकार्य करण्यास तुम्हाला शक्य नसेल तर काही सोपे उपाय करून तुम्हाला पितरांना तृप्त करता येईल. धर्मशास्त्रानुसार खुद्द पितरांनी आपल्या प्रसन्नतेसाठी काही सोपे मार्ग सांगितले आहे.
2)श्राद्ध करणा-या व्यक्तीचे उत्पन चांगले असेल, तर श्राद्ध करताना ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवावे. दक्षिणा द्यावी.
3)एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल आणि श्राध्द करणे शक्य नसेल तर त्याने काळे तीळ अर्पण करावेत. एखाद्या भडजीला मुठभर तीळ दान करावेत. असे केल्याने पितृ प्रसन्न होतील.
4) एखाद्या व्यक्तीला श्राध्दाचे हे मार्गही करण्यास शक्या नसेल, तर त्यांनी पितरांचे ध्यान करून गोमातेला चारा घालावा.
5) हे उपाय करण्यास एखाद्या व्यक्तीला शक्य नसेल तर त्यांनी सूर्यदेवतेला नमस्कार करावे आणि म्हणावे की माझ्याकडे श्राध्दासाठी उपयुक्त असे धन आणि साम्रगी उपलब्ध नसल्याने मी हे कार्य करू शकत नाही. त्यामुळे हे सूर्यदेवा तुम्ही माझ्या पितरांपर्यत माझा नमस्कार पोहचवावा आणि त्यांना संतुष्ट करावे. ह्या सोप्या मार्गाने तुम्हाला तुमच्या पितरांना समाधानी (तृप्त) करू शकता.
First Published: Sunday, October 7, 2012, 16:12