Last Updated: Sunday, August 25, 2013, 19:13
www.24taas.com झी मीडिया, मुंबईआपल्या जीवनात अनेक मित्र मैत्रिणी असतात. मैज मस्ती करता करता जेवढे आपले मित्र बनतात पण त्याचसोबत अनेक कारणांनी काही शत्रू होतात. काही लोकांच्या आयुष्यात तर मित्रांपेक्षा शत्रूच अधिक असतात. मग अशा लोकांना मनात सतत एक नवीन भीती निर्माण होत असते.
जर तुम्हाला अशा शत्रूच्या भीतीमुळे त्रास होत असेल किंवा त्याच्यापासून कायमची मुक्तता पाहिजे असेल तर फक्त एक मंत्र पठण करा आणि मग बघा तुमच्या मनातली सर्व भीती निघून जाईल. बगलामुखी देवीचा हा मंत्र नक्कीच तुमची मदत करेल.
मंत्रऊँ ह्लीं बगलामुखि सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तम्भय।
जिह्वाम् कीलाय बुद्धिं विनाशय ह्लीं ऊँ स्वाहा।।
विधी- अमावस्येच्या दिवशी सकाळी ११ वाजता स्नान करून, स्वच्छ कपडे घालून सर्वात आधी बगलामुखी देवीची पूजा करावी.
- बगलामुखी देवीली लाल वस्त्र, लाल सिंदूर, लाल फूल, चंदन, केसर आणि मिठाई अर्पित करावी.
- यानंतर एकाग्रतेत शांत ठिकाणी बसून रूद्राक्षाची माळ घेऊन या मंत्राचे पठण करावे.
- प्रत्येक अमवसेच्या वेळेस अशा ११ माळा घेऊन जप केला तर नक्कीच तुमच्या समस्या दूर होतील.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 25, 2013, 19:11