प्रेमात यश मिळत नसेल तर करा हे उपाय..., for get success in love life

प्रेमात यश मिळत नसेल तर करा हे उपाय...

प्रेमात यश मिळत नसेल तर करा हे उपाय...
www.24taas.com, मुंबई

तारुण्यात पदार्पण करताच तरुण-तरुणींमध्ये एक प्रकारचे आकर्षण तयार होते. कधी-कधी या आकर्षणाचेच रुपांतर प्रेमात होते. माणसाला देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे प्रेम होय. मर्यादेत राहून प्रेम केल्यास त्यात काही दोष नाही. निस्वार्थपणे करण्यात येणारे प्रेम हेच खरे प्रेम.

प्रेमात यशस्वी होण्यासाठी काही सोप्या टीप्स...
> प्रेमी युगुलाने शनिवार आणि अमावस्यच्या दिवशी एकमेकांना भेटू नये. या दिवशी एकमेकांना भेटल्याने आकर्षण कमी होते. प्रेमात यश मिळण्याची शक्यता कमी होते.

> प्रेमी युगुलाने शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी एकमेकांना भेटावे. या दिवशी भेटल्याने प्रेम वाढते.

> मुलींनी हातात हिरव्या बांगड्या आणि शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करावेत.

> मुलांनी दररोज पुढील मंत्राचा जप करावा.
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम।।

> मुलींनी दररोज पुढील मंत्राचा जप करावा.
ओम् कात्यायानी महाभागे महायोगिन्यधीश्वरीं।
नन्द गोप सुतं देवि पतिं में कुरुते नम:।।

First Published: Friday, March 29, 2013, 07:45


comments powered by Disqus