गणेश व्रत करण्याने मिळते इष्ट फळ, Ganesh Pooja astro News

गणेश व्रत करण्याने मिळते इष्ट फळ

गणेश व्रत करण्याने मिळते इष्ट फळ
www.24taas.com

‘श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे ‘सिद्धीविनायक व्रत’ या नावाने ओळखले जाते. पूजेत गणपती असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल.

जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते. कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व.

गणेशतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दूर्वा, शमीची पत्री, मंदारची पत्री इत्यादी वाहतात, तसे काही आकृतीबंधांमुळेही गणेशतत्त्व आकर्षित होण्यास साहाय्य होते. रांगोळी, गणपतीची आरास, तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होतो.

First Published: Wednesday, February 20, 2013, 07:38


comments powered by Disqus