Last Updated: Wednesday, January 29, 2014, 19:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई तरुणपण... प्रत्येकाला आपल्या उत्तरार्धात कुठले दिवस सर्वात जास्त आठवत असतील तर ते हेच दिवस असतात. कारण, याच वयात तर पण मुक्तपणे जगण्याचा प्रत्येक प्रयत्न केलेला असतो. नाही का! पण, याच दिवसांत एकदा वाईट मार्गाकडे मन झुकलं तर संपूर्ण जीवनालाच कलाटणी मिळण्याची शक्यता असते. काही वेळा संपूर्ण जीवनावर या दिवसांचा परिणाम कायम राहतो. त्यामुळे या वयात काही गोष्टींकडे लक्ष देण्याची फार गरज असते. ही गरज काही केवळ तुमच्या आई-वडिलांची नाही तर तुमची असते. केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या वर्तमानकाळासहीत भविष्यासाठी...
तारुण्यात मन फार चंचल असते. नेहमी नवीन गोष्टींकडे मन नेहमी आकर्षित होत. वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशा वेळी अनेकदा चुकीच्या दिशेकडे विचार वळू लागतात, जे भविष्य आणि आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामुळे तारुण्य आणि लग्नापूर्वी मन चुकीच्या दिशेकडे भरकटणार नाही याकडे लक्ष द्यावे. मनावर नियंत्रण ठेवावे. काय करता येईल यासाठी टाकुयात एक नजर....
> बेडरुममध्ये अशा वस्तू ठेऊ नयेत, ज्यामुळे लग्नापूर्वी कामवासना वाढेल. जेव्हा या भावना एका मर्यादेपेक्षा जास्त वाढू लागतात तेव्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. बेडरुममध्ये कामुक फोटो लावू नयेत. एकांतामध्ये असे फोटो मन विचलित करतात.
> जर सर्व गोष्टी ठीक असूनही मुलगा किंवा मुलीचे लग्न जमण्यात अडचण येत असेल तर, घरामध्ये वास्तुदोष असण्याची शक्यता असते. लग्न न जमान्यामागे वास्तुदोष हे एक कारण असू शकते.
> घरामध्ये पलंगाच्या खाली कहीतरी सामान नक्की असते. ही एक सामान्य गोष्ट आहे. पलंगाचे आपल्या जीवनात महत्वपूर्ण स्थान असते. २४ तासातील ६ ते ८ तास आपण त्यावर झोपतो. यावरून हे स्पष्ट होते की, शांत झोपेसाठी चांगला स्वच्छ पलंग असणे आवश्यक आहे.
> वास्तुशास्त्रानुसार पलंग चांगला असला तरी त्यावर झोपणाऱ्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यात अडचण येत असेल किंवा दुसरी एखादी अडचण असले तर त्यांच्या पलंगाखाली वास्तुदोष निर्माण करणारी वस्तू ठेवण्यात आलेली असावी. जर पलंगाच्या खाली वास्तुदोष असेल तर विविध प्रकारचे मानसिक तणाव निर्माण होतात. मनुष्य व्यर्थ गोष्टीच्या चिंतेत राहतो.
> लोखंडाचे सामान, जास्त वजन असलेले सामान, वापरात न येणाऱ्या वस्तू, पलंगाखाली स्वच्छता नसणे, औषधे ठेवणे, अधार्मिक वस्तू या सर्व कारणांमुळे वास्तुदोष निर्माण होतो.
> विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर झोपतात, त्या पलंगाच्या खाली लोखंडाच्या वस्तू किंवा बिनकामाचे, व्यर्थ सामान ठेऊ नये. या वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होतो. या वस्तूंमुळे अविवाहित लोकांचे मन चुकीच्या दिशेने भरकटते.
वास्तुशास्त्र सकारात्मक आणि नकरात्मक उर्जेच्या सिद्धांतावर कार्य करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे नकारात्मक प्रभाव वाढतो, ज्यामुळे तरुणांच्या विचारात नकारात्मकता निर्माण होते.
> पलंगाच्या खाली वास्तुदोष असल्यास वाईट स्वप्न पडतात, विचार अशुद्ध होतात. अधार्मिक कृत्य करण्याचे विचार मनात येतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 19, 2013, 08:02