Last Updated: Wednesday, December 5, 2012, 07:22
www.24taas.com, मुंबईदेव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत. आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा. देवाच्या चौरंगावर देव्हाऱ्यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा ठेवावा.
पूजेला दर्शनाला जाताना व पुजेला बसताना काही सूचनाचप्पल घालून देवाच्या पुजेला जावू नये. वाहनात बसून पूजेला जावू नये. देवाच्या उत्साहात सेवा करावी. देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा. अशौचात देवाची पूजा करू नये. गप्पा मारीत, बडबड करीत पूजा करू नये. खोटे बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये. स्त्रियांचा अनादर व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये.
स्नान करून उत्साहाने, आनंदाने देव पूजा करावी. बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवाम्चे पंचायतन असते. पंचायतन म्हणजे पाच देवांचा एके ठिकाणी केलेला सच, शंकर, विष्णु, सूर्य, गणपती आणि देवी हे ते पाच देव असतात. त्यांपैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे चार देव त्याच्या भोवती कमळट किंवा ताम्हणात मांदून त्यांची पूजा करावी.
First Published: Wednesday, December 5, 2012, 07:11