आनंदाचा वेल... घराच्या भिंतींवर!, how to plant climber in house

आनंदाचा वेल... घराच्या भिंतींवर!

आनंदाचा वेल... घराच्या भिंतींवर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

झाडांमुळे आपलं आयुष्य वाढतं... होय, हे खरं आहे. कारण घराच्या आवारात लावलेली झाडं आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात... आणि आनंदी जीवनच तुमच्या दिर्घायुष्याचा रस्ता मोकळा करतात.

फेंगशुईनुसार स्वस्थ आणि सुंदर रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते. फेंगशुईत झाडांना नऊ आधारभूत सुरक्षा सावधगिरीमधील एक मानण्यात आले आहे. म्हणून घरातील रिकाम्या जागेत रोप लावायला पाहिजे.


पण, घरात कसं लावाल रोप...
- वर चढणारी वेल ज्याला `क्लायम्बर्स` म्हणतात जसे - मनी प्लांटला कोपऱ्यात लावून त्या जागेची उदासीनता कमी करू शकता.

- घरातील दक्षिण-पूर्वेतील कोपऱ्याला धन आणि समृद्धीचा कोपरा म्हणतात, म्हणून येथे चौरस पानांचे रोप लावायला पाहिजे.

- वाळलेले किंवा मृत झालेल्या रोपांना लगेचच तेथून काढायला पाहिजे. यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.

- घरातील समोरच्या भागात काटेरी किंवा या टोकदार पानांचे रोप नाही लावायला पाहिजे. हे रोप नकारात्मक ऊर्जेला सहयोग प्रदान करतात.

- या लहान सहानं गोष्टींकडे लक्ष्य दिले तर तुम्ही निसर्गरम्य हिरवळ आणि सुखाचा अनुभव करू शकता. फक्त झाड-झुडपं आमच्या वातावरणाला शुद्ध करण्यास मदत करतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 08:02


comments powered by Disqus