स्वतःचं घर घ्यायचं असल्यास... If you want to build your own house

स्वतःचं घर घ्यायचं असल्यास...

स्वतःचं घर घ्यायचं असल्यास...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपलं स्वतःचं एक घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र अनेक कारणांमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यात अडचणी येतात. मात्र आपलं स्वतःचं घर लवकरात लवकर व्हावं, यासाठी काही तोडगे दिले आहेत. त्यांचा वापर केल्यास तुम्हाला चमत्कृतीपूर्ण फळ मिळेल.

साधारणतः जन्मपत्रिकेत मंगळ किंवा शनीशी संबंधित दोष असतात, तेव्हा घरबांधणीत अनेक अडथळे येतात. अशावेळी लिंबाच्या लाकडाचं छोटंसं घर तयार करून ते गरीब मुलाला दान करावं. यामुळे स्वतःच्या घराचा योग जुळून येतो. तसंच रविवारी गाय़ीला गूळ खायला घालावा. यामुळे आपलं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल.

घरामध्ये पैसा टिकत नसल्याचीही तक्रार अनेकांची असते. जर तुमच्या घरात चिमणीने घरटं बांधलं असेल, तर तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता राहाणार नाही. पक्ष्याचं घरटं हे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 16:34


comments powered by Disqus