Last Updated: Thursday, September 6, 2012, 17:10
www.24taas.com, मुंबईचाळीत किंवा भाड्याच्या खोलीत राहाणाऱ्यांना आपलं स्वतःचं चांगलं घर असावं, असं वाटत असतं. बऱ्याचवेळा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आपल्याला स्वतःच्या घरात राहायला मिळेलच, असं नाही.
काही वेळा घराच्या बांधकामात अनेक अडचणी येतात. बऱ्याच वेळा बांधकाम अर्धवट राहातं. घराच्या काही समस्या उद्भवतात. बिल्डरच्या वागण्यामुळे इमारतीच्या बांधकामाला वेळ लागतो. ते अधिकृत होत नाही. अशा अनेक समस्या होतात, ज्यामुळे घराचचं समाधान लाभत नाही. यावर शास्त्रात काही उपाय दिले आहेत.
घराचे बांधकाम करत असताना समस्या उद्भवत असतील तर दर शुक्रवारी एका गरीब व्यक्तीस अन्नदान करावं. त्याला योग्य ती दक्षिणा द्यावी. रविवारी गायीला गूळ खायला घालावा. काही दिवस असं केल्यास घरासंदर्भातील डोक्यावरील ताण कमी होत जाईल. घराच्या समस्या आपोआप दूर होतील. लवकरच घराचे बांधकाम पूर्ण होईल. तुमचे स्वतःचे घर तुम्हाला ताब्यात मिळेल.
First Published: Thursday, September 6, 2012, 17:10