Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:21
www.24taas.com, नवी दिल्ली नवरात्रीचे आठ दिवस कसे गेले ते समजलचं नाही. उद्या दसरा... म्हणजेच आज नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस. देवी दुर्गेच्या नऊ सुंदर रूपे असलेल्या देवी सिध्दीदात्रीची आज प्रथेप्रमाणे पूजा केली जाते.
नवरात्रींमध्ये पुजा केल्या जाणाऱ्या देवींमध्ये माता सिध्दीदात्री ही शेवटची देवी आहे. देवी दुर्गेची नववी शक्ती म्हणजे माता सिध्दीदात्री. सिध्दीदात्री देवी सर्व प्रकारच्या सिध्दी प्रात्प करून देणारी देवी आहे. देवीच्या या नवव्या स्वरूपाला नवदुर्गांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि मोक्ष प्राप्त करून देणारी दुर्गा मानली जाती. सिध्दीदात्री देवी ईश्वर विष्णुंची पत्नी लक्ष्मी प्रमाणे कमळाच्या आसनावर विराजमान आहेत आणि हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र धारण केलेलं असं सिध्दी देवीचं सुमुख आहे.
देव, यक्ष, किन्नर, ऋषी, दानव, मुनी, सिध्दीदात्री देवीची नवरात्रीत नऊदिवस पूजा करतात. यामुळे त्यांना यश, बळ, आणि धन मिळतं, असं समजलं जातं. सिध्दीदेवी या सर्व भक्तांना महाविद्येची अष्टसिध्दी प्रदान करते. देवी भक्तांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिध्दीदात्रीची पूजा करण्यासाठी नऊ प्रकारच्या अन्नांचा प्रसाद, नवरस युक्त जेवण, तसेच नऊ प्रकारची फळ- फूल देवीला अर्पण केले पाहिजे. अशा प्रकारे नवरात्रीचे समापन केल्याने या संसारात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या गोष्टींची प्राप्ती होते.
First Published: Tuesday, October 23, 2012, 16:21