झाडूवर पाय पाडू नका... दारिद्र्य मागे लागेल..., News of Astro

झाडूवर पाय पाडू नका... दारिद्र्य मागे लागेल...

झाडूवर पाय पाडू नका... दारिद्र्य मागे लागेल...
www.24taas.com, मुंबई

शास्त्रानुसार झाडू हे वैभव आणि संपत्तीची देवी महालक्ष्मीचेच प्रतिक आहे. झाडू आपल्या घरातून गरिबीरूपी कच-याला बाहेर काढते हे यामागील कारण आहे. घर स्वच्छ असेल तर आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतात.

प्राचीन परंपरा जपणारे लोक आजही झाडूवर चुकून जरी पाय पडला तरी झाडूला प्रणाम करतात. कारण झाडू ही लक्ष्मी आहे. विद्वानांच्या मतानुसार झाडूवर पाय पडल्याने महालक्ष्मीचा अवमान होतो. झाडू घरातील कचरा बाहेर काढते. कच-याला दारिद्य्राचे प्रतिक मानले गेले आहे.

ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. घरात समृद्धी असते. याउलट ज्या घरात जळमटे असतात, अस्वच्छ वातावरण असते तेथे दारिद्य्र आणि गरिबी असते. अस्वच्छ घरात राहणा-या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणूनच झाडूचा आदर केला जातो.

First Published: Tuesday, November 13, 2012, 17:03


comments powered by Disqus