...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!, shavani somvar

...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!

...अशी करतात श्रावणी सोमवाराची पूजा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष... सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.

श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्या. प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणाऱ्याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.

असे करावे व्रत :
श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.
पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
`मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये`

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा :
`ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर

`ऊँ नमः शिवाय` हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 08:04


comments powered by Disqus