Last Updated: Thursday, December 26, 2013, 18:48
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा आणखी काही... येत्या काही दिवसांत येऊन ठेपलेलं वर्ष - २०१४ आणि वर्ष – १९४७ हे कॅलेंडरप्रमाणे एकसारखे असल्याचं दिसून येतंय. अगदी कॉपी... पेस्ट!
वर्ष-२०१४ आणि वर्ष-१९४७ मधल्या सगळ्याच तारखा अगदी एकसारख्या आहेत. परंतु, या दोन वर्षांमध्ये सणवार मात्र भिन्न-भिन्न दिवशी येतील. कारण, हे सणवार हिंदू-पंचांगानुसार आणि ग्रहांच्या गतीवर आधारीत असतात. वर्ष-१९४७ प्रमाणेच वर्ष-२०१४ मध्येही नवं वर्ष बुधवारी सुरू होतंय... आणि दोन्ही वर्षांत भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्ट शुक्रवारी येतोय.
वर्ष-१९४७ मध्ये होळी ६ मार्च, रक्षाबंधन ३१ ऑगस्ट, दसरा २४ ऑक्टोबर आणि दिवाळी १२ नोव्हेंबर रोजी आले होते... तर, येणाऱ्या वर्षात - २०१४ मध्ये होळी १७ मार्च, रक्षाबंधन १० ऑगस्ट, दसरा ४ ऑक्टोबर आणि दिवाळी २४ ऑक्टोबर रोजी येणार आहे.
२०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजिक तज्ज्ञ मात्र या दोन्ही वर्षांत काही राजनैतिक दृश्यांत समानता दिसतेय का? हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 18:43