Last Updated: Saturday, May 19, 2012, 14:52
www.24taas.com, मुंबई फेंग शुईमध्ये आपलं आयुष्य सुखकर करण्याचे अनेक साधे आणि सोपे उपाय दिले आहेत. फेंग शुईमधील नियम पाळले की अनेक गंभीर व्यापार, उद्योग, करीअर यांच्याशी संबंधित अनेक समस्यांचं निवारण होतं.
जर आपल्याला व्यापार उद्योग किंवा नोकरीसंबंधी काही समस्या असेल, तर आपल्या दुकानात, ऑफिसमध्ये किंवा खोलीमध्ये क्रिस्टल ग्लोब ठेवा. या ग्लोबमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते. या ऊर्जेमुळे तुमचं व्यक्तिमत्वही बदलतं आणि यशप्राप्तीसाठी मदत होते. विद्यार्थ्यांसाठीही क्रिस्टल ग्लोब फायदेशीर ठरतो. या ग्लोबमुले विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते.
क्रिस्टल ग्लोब वापरण्याच्या २४ तास आधी ग्लोब मीठामध्ये ठेवावा. त्यानंतर पाण्याने धुवून काचेच्या भांड्यात ठेवावं. हा ग्लोब २-३ तास उन्हात ठेवून द्यावा. यामुळे क्रिस्टल ग्लोब अधिक प्रभावशाली बनतो. हा ग्लोब दिवसातून तीन वेळा फिरवावा. म्हणजे यातून निघणारी ‘यांग’ ऊर्जा संपूर्ण वातावरणात पसरते.
First Published: Saturday, May 19, 2012, 14:52