Last Updated: Monday, December 26, 2011, 15:38
झी २४ तास वेब टीम, मुंबईआपल्याला व्यापार क्षेत्रात फायदा पाहिजे असेल तर आपल्यासाठी ही ट्रिक खूपच कामाची आहे. यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोण आपल्यासाठी फायदेशीर आहे.
यासाठी तुम्हांला फार काही करण्याची गरज नाही. फक्त त्या व्यक्तीशी हस्तांदोलन करायचे आणि तुम्हांला कळेल की या माणसापासून तुम्हांला फायदा होईल की तोटा.
जाणून घ्या फंडा –
- ज्या माणसाचा तळहात रुक्ष आणि कडक असतो ते काही कामाचे नसतात. त्यांना ज्या प्रकारे सल्ला दिला जातो, ते त्याप्रमाणेच काम करतात.
- कडक हातांची माणसे दुसऱ्यांच्या सांगण्यावर लवकर विश्वास करतात आणि ते अस्थिर स्वभावांचे असतात.
- ज्या लोकांचे तळहात छोटे असतात, असे खूप कामाचे असतात. या व्यक्ती तुम्हांला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतात.
- ज्यांचे हात खूपच कडक असतात, ते बुद्धिहीन असतात. ते दुसऱ्यांना दुःखी पाहून खूष होणारे असतात. सहसा असे हात अपराधी लोकांचे असतात. अशा व्यक्तींचे जीवन रुक्ष आणि कठोर असते.
- ज्यांचे हात मऊ आणि लवचिक असतात, अशा व्यक्ती व्यापारात फायदा देणाऱ्या असतात.
- कडक आणि रुक्ष हातांच्या व्यक्ती लव लाइफमध्येही कठोर असतात.
First Published: Monday, December 26, 2011, 15:38