Last Updated: Tuesday, June 12, 2012, 13:58
www.24taas.com, मुंबई सुंदर आणि सुशील, सुसंस्कृत पत्नी मिळावी अशी प्रत्येक तरुणाची इच्छा असते. अशी पत्नी जी नीट संसार करेल, केवळ चांगली पत्नीच नाही तर चांगली सून आणि उत्तम माताही बनेल. पत्नीचं व्यक्तिमत्व प्रसन्न असावं. समाजातील लोकांना आपल्या भाग्याचा हेवा वाटावा, अशा पत्नीची सर्वांना इच्छा असते.
जर तुम्हीही अशाच पत्नीची इच्छा धरून असाल, तर दुर्गासप्तशतीतील २४वा श्लोक रोज म्हणावा. हा श्लोक अत्यंत प्रभावी असून याची प्रचिती ताबडतोब येते. या मंत्राच्या नित्य पठणामुळे तुम्हाला मनाजोगती हवी तशी पत्नी लवकरात लवकर मिळेल.
मंत्र-
पत्नीं मनोरमांदेहि मनोवृत्तानुसारिणीम्|तारिणीं दुर्गसंसारं सागरस्यकुलोद्भवाम।। सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून सर्वप्रथम दुर्गामातेची पूजा करावी. यानंतर एकांतात दर्भासनावर बसून लाल चंदनाच्या मोती मालेने वरील मंत्राचा जप करावा. दररोज या मंत्राच्या ५ माळा ओढल्यास सुंस्वरुप आणि सुस्वभावी पत्नी मिळते. जर एक जागा, वेळ आणि माळ ठरवून रोज मंत्र केलात, तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.
First Published: Tuesday, June 12, 2012, 13:58