आपलं आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी... - Marathi News 24taas.com

आपलं आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी...

www.24taas.com, मुंबई
 
ज्या प्रमाणात सध्या महागाई वाढत आहे, त्याप्रमाणात आपलं उत्पन्न वाढत नाही. आपलं इन्कमही वाढत राहावं, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण होणं खरंतर अशक्य आहे. त्यामुळेच उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असते आणि पर्यायी श्रीमंती आपल्याला हुलकावणी देत राहाते. खाली दिलेला मंत्र तुम्हाला आर्थिक समृद्धी देईल.-
 
पाच कमळाच्या बिया आणि पाच लाल फुलं एका पिवळ्या कागदावर ठेऊन कमळाच्या फुलावर कुंकवाने खालील मंत्र २१ वेळा लिहावा.
 
ऊँ श्रीं शिवत्वं श्रीं ऊँ
हा कागद कमळाच्या बिया आणि फुलांमध्ये गुंडाळून बुधवारी रात्री झाडांच्या फांदीमध्ये ठेवावा. यामुळे आपला खर्च कमी होतो. उत्पन्न घटत नाही, तर वाढतच जातं.

First Published: Wednesday, June 13, 2012, 16:02


comments powered by Disqus