बँकेत पैसे ठेवताना म्हणा लक्ष्मी मंत्र! - Marathi News 24taas.com

बँकेत पैसे ठेवताना म्हणा लक्ष्मी मंत्र!

Tag:  
झी २४ तास वेब टीम, मुंबई
पैसा किंवा धनाची लालसा अगदी प्राचीन काळापासून सर्वांच्या मनात आहे. सर्व सुविधा मिळविण्यासाठी धनाची आवश्यकता असते. काही लोकांना कमी मेहनतीने अधिक धन मिळते तर काही कठोर मेहनत करूनही यथायोग्य पैसा प्राप्त होत नाही. शास्त्रात असे काही नियम दिले आहेत की, ज्याचे पालन केल्यास पैशांसंदर्भातील सर्व काळजीतून आपण मुक्त होऊ शकतो.
धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न केल्यावरच कोणत्याही व्यक्तीला धनाची प्राप्ती होऊ शकते. महादेवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर पडण्यासाठी महालक्ष्मीची नियमित आराधना केली पाहिजे. या शिवाय आपण जेव्हा पण बँकेत पैसे भरण्यासाठी जाणार असाल किंवा पैसे काढणार असाल त्यावेळी महालक्ष्मीच्या मंत्राचा जप केला पाहिजे.
 
ऊँ महालक्ष्म्यै नम:,
ऊँ ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम:,
ऊँ श्रीं ह्रीं क्लीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम:
या मंत्राचा जप केला पाहिजे. असे केल्यास बँकेत जमा केलेला पैसा सुरक्षित राहिल आणि त्यात वाढ होत राहिल. महालक्ष्मी मंत्राच्या जपाने देवीची कृपाही आपल्यावर राहते.
 

First Published: Wednesday, December 7, 2011, 16:04


comments powered by Disqus