Last Updated: Wednesday, June 20, 2012, 17:13
www.24taas.com, मुंबई चांगली नोकरी मिळावी ही आजच्या प्रत्येक सुशिक्षित तरुण-तरुणीची इच्छा असते. मात्र, एखादी नोकरी मिळण्याच्या मार्गातला सर्वांत महत्त्वाचा आणि कठीण टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. बऱ्याच वेळेस आपण इंटरव्ह्यूच्या वेळी नर्व्हस होतो. आपला आत्मविश्वास ढळतो आणि इंटरव्ह्यूमध्ये पास होऊ शकत नाही. जर, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायचं असेल, तर त्यासाठी एक सोपा तोडगा आहे.
एखाद्या शुभदिनी सकाळी लवकर उठून स्नान करावं. यानंतर पांढऱ्या शुभ्र सुती कापडाच्या आसनावर पूर्वाभिमुख बसावं. आपल्यासमोर पिवळ्या रंगाचं कापड पसरवा. कापडावर स्फटिकाची १०८ मण्यांची माळ ठेवा. या माळेवर केशर आणि अत्तर शिंपडून त्याची पूजा करा. यानंतर त्याला धूप, दीप, अगबत्ती दाखवून वर दिलेल्या मंत्राचा ३१ वेळा जप करा. ११ दिवस हा विधी केल्यास ही स्फटिक माळ सिद्ध होईल. ही माळ गळ्यात घालून किंवा आपल्या जवळ ठेऊन तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला गेलात, तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये नक्की पास व्हाल. आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळेल.
मंत्र- ऊँ ह्लीं वाग्वादिनी भगवती मम कार्य सिद्धि कुरु कुरु फट् स्वाहा।
First Published: Wednesday, June 20, 2012, 17:13