Last Updated: Friday, June 29, 2012, 21:53
www.24taas..com, मुंबई अनेक वर्षांपासून कोर्टात जर एखादी केस चालू असेल, तर ती लवकरात लवकर जिंकण्याचा एक उपाय आहे. जमीन-जुमला, घर यांचे कज्जे खटले ही बऱ्याच घरातील डोकेदुखी ठरत असतात. त्यातून घरातील वातावरण बिघडतं. मनात असमाधान असतं. एक प्रकारचं दडपण, तणाव असतो. हे सगळं संपवण्यासाठी एक सोपा उपाय करावा.
एखाद्या मंगळवारपासून रोज संध्याकाळी चार ते पाच वाजता पोळ्यांना तूप साखर लावून कावळ्यांस खायला घाला. केस चालू आहे तोपर्यंत कावळ्यांना अशा प्रकारे पोळी खाण्यास द्या. तारखेच्या दिवशी त्या कावळ्यांपैकी एखाद्या कावळ्याचं एक पिस आपल्या खिशात टाकून कोर्टात जा.
वर दिलेल्या तोडग्याचा फायदा तुम्हाला लवकरच जाणवेल. या प्रभावाने कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. खटला जिंकल्यानंतरही किमान एक आठवड्यापर्यंत कावळ्यांना पोळ्या टाकणे चालूच ठेवा.
First Published: Friday, June 29, 2012, 21:53