अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी... - Marathi News 24taas.com

अडलेली कामं मार्गी लागण्यासाठी...

www.24taas.com, मुंबई
 
आपण करत असलेली अनेक कामं सगळं व्यवस्थित असूनही काही वेळा पूर्ण होत नाहीत. कित्येक वेळा शेवटच्या क्षणी कामात अडथळा येतो. कधी कधी जे लोक आपल्या विरुद्ध असतात, त्यांच्यावरच आपलं काम अवलंबून असतं.
 
आपल्या कामात अडथळे आले किंवा विनाकारण काम अडून राहिलं तर आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. दुःख होतं. नैराश्य येतं. आपलं काम योग्य वेळेत योग्य मार्गाने पूर्ण होण्यासाठी पुढील मंत्राचा जप करावा. लवकरच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.
 
मंत्र
 
ओम श्रीं श्रीं ओम ओम श्रीं श्रीं  हुं फट् स्वाहा ।
 
विधी
सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करा. एकांतात बसून रुद्राक्ष माळेने वर दिलेल्या मंत्राचा जप करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल. अडून राहिलेली कामं पूर्ण होऊ लागतील.

First Published: Saturday, June 30, 2012, 17:05


comments powered by Disqus